एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झोका खेळताना गळफास, जळगावात बालकाचा मृत्यू
झोक्याला गोल गोल फिरवताना झोक्याचा दोर पवनच्या गळ्यात अडकला आणि त्याला फास बसला.
जळगाव : झोक्यावर खेळताना गळफास लागून 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. जळगावात घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगावातील पारोळा शहरात पेंढारपुरा भागातील पाताळेश्वर मंदिर परिसरात हा प्रकार घडला. कैलास महाजन हे भाजीपाला व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहतात. सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांचा 13 वर्षीय मुलगा राहत्या घरात झोक्यावर खेळत होता. त्यावेळी कैलास महाजन झोपले होते, त्यांची पत्नी पूजा करत होती, तर धाकटा मुलगा बाहेर खेळत होता.
पवन महाजन घरात मागच्या बाजूला असलेल्या झोक्यावर खेळत होता. त्यावेळी झोक्याला गोल गोल फिरवताना झोक्याचा दोर पवनच्या गळ्यात अडकला आणि त्याला फास बसला. त्यावेळी घराशेजारी एकटा असल्यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहचला नाही.
काही वेळाने त्याचे वडील कैलास महाजन मागच्या खोलीत गेले असता पवन झोक्याच्या दोरीला गळफास बसलेल्या अवस्थेत आढळला. गळफास इतका घट्ट बसला होता, की झोक्याचा दोर चाकूने कापून पवनला बाहेर काढावं लागलं.
आधी दोन खाजगी आणि नंतर कुटीर रुग्णालयात त्याला दाखल केलं. मात्र कुटीर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement