एक्स्प्लोर
हॉटेल, बार, रेस्टॉरंट पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार!
नागपूर : नविन वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या पोलिस महासंचालकांनी बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्रशासन आणि सरकारने हॉटेल चालक आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्यभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी देखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने पोलिस प्रशासनाला हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती.
सेलिब्रेशन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित बार किंवा हॉटेल चालकावर असेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय ध्वनी प्रदषणाच्या नियमांचं पालन करण्याचे आदेशही ऑर्केस्ट्रा चालकांना दिले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राबाहेर आज रात्री साडे 11 ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर या परिक्षेत्रासाठी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement