एक्स्प्लोर
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण
सोने व्यावसायिकांच्या मते सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत होताना दिसत आहे.

जळगाव : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ यामुळे दरात प्रतितोळा पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे. याचा परिणाम थेट जळगावच्या सुवर्णनगरीत दिसून आला आहे.
ग्राहकांनी या संधीचा लाभ उठवत सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोमवारी जळगावात सोन्याचा दर 31 हजार 300 रुपये इतका होता.
दरम्यान, ऐन दिवाळीत सोन्याचे दर वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहण्यास पसंती दिली होती. परंतु आता दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सोनेखरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे
सोने व्यावसायिकांच्या मते सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत होताना दिसत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर देखील सोन्याच्या मागणीत घट झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरांत दिसून येतं आहे. त्यामूळेच ग्राहकांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
