एक्स्प्लोर
धुळ्यात प्रॉपर्टीच्या वादातून वाहन चालकाला जिवंत जाळलं
धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात जलसंपदा विभागाच्या वाहन चालकाला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. गोकुळ रतन माळी यांना प्रॉपर्टीच्या वादातून कारमध्ये तोंडात बोळा कोंबून, सीटला बांधून जिवंत जाळलं आहे.
साक्री शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाहेरची ही घटना आहे. याप्रकरणी सख्या चुलत भावासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे 31 जानेवारी रोजी गोकुळ माळी यांची स्वेच्छा (VRS) निवृत्ती होती.
काल रात्री 11 ते 12.30 च्या दरम्यानची ही घटना आहे. या घटनेने साक्रीत शहरात एकच खळबळ उडाली आहे. साक्री पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement