एक्स्प्लोर

कंत्राट असक्षम कंपन्यांना देऊन नागपूरकरांना कचऱ्यात ढकललं; शिवसेनेचा भाजपवर आरोप

नागपुरात सध्या कचऱ्यावरुन महाभारत सुरु आहे. वेळेत कचरा न उचलल्यामुळं शहरात दुर्गंधी पसरत आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंत्राट असक्षम कंपन्यांना देऊन नागपूरकरांना कचऱ्यात ढकलल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

नागपूर : राज्यात सत्तास्थापनेवरुन भाजपच्या विरोधात भूमिका घेणारी शिवसेना आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. नागपुरात कचऱ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपशासित महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. मनपा अधिकारी व काही भाजप नेत्यांनी कचरा संकलनाचे कंत्राट असक्षम कंपन्यांना देऊन नागपूरकरांना कचऱ्यात ढकलल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. नव्याने कंत्राट मिळालेल्या ए जी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्या नागपुरात रोज 1200 टन ऐवजी 500 ते 600 टन कचरा उचलत असल्याने अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून शहरात दुर्गंधी पसरल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शहरात महापालिकेकडून कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई होत असल्याने शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्त्या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी आणि घाण पसरत आहे. महापालिकेने नुकतेच कचरा उचलणाऱ्या जुन्या कंत्राटदाराच्या जागी ए जी एन्व्हायरो आणि बीव्हीजी अशा 2 खासगी कंपन्यांकडे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्या सध्या रोज बाराशे टन कचऱ्याऐवजी फक्त पाचशे ते सहाशे टन कचराच उचलत आहे. त्यांच्याकडून कचरा उचलण्यामध्ये होणाऱ्या या दिरंगाईमुळे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहे. दुसऱ्या बाजूला या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महापालिका आणि भाजपवर गंभीर आरोप लावले आहे. आधीच्या कंपनीला प्रति टन साडेचौदाशे इतका टन दर दिला जात असताना कचरा संकलन होत होतं. मात्र, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांसोबत संगनमत करत नव्या कंपन्यांना जास्त दराने कंत्राट बहाल केले. मात्र, ए जी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांकडे पुरेशी यंत्रणा आणि मनुष्यबळ नसल्याने ते नागपुरात रोज बाराशे टन कचऱ्याऐवजी अर्धाच कचरा उचलत आहेत. त्यामुळे नागपूरकरांना कचऱ्याच्या दुर्गंधीत जगावे लागत आहे. आज शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचा कचरा उचलून थेट महापालिकेत आणून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्यांना 24 तासात परिस्थिती सुधारण्याचा आश्वासन देण्यात आले. त्यांनतर शिवसेनेने महापालिकेत कचरा फेकण्याचं त्यांचं आंदोलन 24 तासांसाठी स्थगित केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजप विरोधात शिवसेना आक्रमक -  राज्यातील विधानसभेची निवडणूक सोबत लढलेले भाजप-शिवसेना सध्या एकमेकांच्या विरोधी भूमिकेत आहे. मुख्यमंत्री पदावरुन सुरु झालेला वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळं संधी मिळेल तिथे शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संबंधित बातम्या : मुंबईकरांनो सावध व्हा! समुद्राने किनाऱ्यांवर फेकला 188 मेट्रिक टन कचरा मुंबईकरांना कचऱ्यावर भरावा लागू शकतो अतिरिक्त कर जीपीएसद्वारे घंटागाडीवर लक्ष, कचरामुक्तीसाठी अनोखा उपक्रम Nagpur Garbage | कचरा विकत घेण्यासाठी महापालिकेने सुरु केली 6 दुकानं | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget