एक्स्प्लोर
Advertisement
बाप्पांच्या निरोपाच्या तयारीला वेग, गणेशभक्त मिरवणुकीसाठी सज्ज
आज अनंत चतुर्दशी. 10 दिवसांची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज थाटामाटात मुंबई-पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येणार आहे.
मुंबई : आज अनंत चतुर्दशी. 10 दिवसांची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज थाटामाटात मुंबई-पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशसनाने कडेकोट व्यवस्थ केली असून, संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे.
मुंबईत पालिकेसह पोलिसही सज्ज
मुंबई महापालिकेने गिरगाव, जुहू, वर्सोवा या प्रमुख चौपाट्यांवर जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी मोटारबोटी, सीसीटीव्ही यंत्रणा, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश, प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात आलीय.
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिस प्रशासनही सज्ज झालं आहे. मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराबाहेर मुंबई पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी लावली. यावेळी पोलिसांकडून रात्रभर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमही राबवली. आज दिवसभरही मुंबईच्या रस्त्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व विसर्जनस्थळी मुंबई पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतील वाहतुकीतही बदल
गणेशभक्तांना प्रवास करणं सोपं जावं म्हणून आज रविवार असूनही, रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतला नाही. नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक सुरु राहणार आहे.
तसेच, मुंबईतील विविध परिसरातील 53 रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, 56 मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु राहील.
परदेशी नागरिक बाप्पाचा विसर्जन सोहळा अनुभवणार
राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करून दिल्याने 300 परदेशी पर्यटक गिरगाव चौपाटीवर विसर्जनाचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यास उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रथमच निलंबरी बसमधून मुख्यमंत्री आणि इतर मंत्री गिरगाव चौपाटीवर फेरफेटका मारणार आहेत.
नाशिकमध्येही जय्यत तयारी
नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झालीय. 50 सीसीटीव्ही कॅमेरे, 3 हजार पोलिस उद्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नजर ठेवणार आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 1858 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 7 जणांना तडीपार करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांनी आज शहरात संचलन केलं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचे मिरवणुकीसाठीचे रथ तयार झाले आहेत. तसेच विविध ढोल-ताशा पथक आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्या बांधल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement