एक्स्प्लोर

'मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख मास्टर माईंड', आमदार मौलाना मुफ्तींचा विधानसभेत सनसनाटी आरोप!

Malegaon Firing : मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. यावरून मौलाना मुफ्ती यांनी आसिफ शेख यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

मालेगाव : काही दिवसांपूर्वी मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा (Malegaon Former Mayor Abdul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणावरून मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (Maulana Mufti Mohammad Ismail) यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांच्यावर विधानसभेत गंभीर आरोप केला आहे. यामुळे मालेगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक (Abdul Malik) हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार (Firing) करून फरार झाले. या गोळीबारात अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मालेगावात तणावाचे वातावरण झाले होते.  यानंतर एमआयएमसचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी अब्दुल मलिक यांची भेट घेत घटनेची चौकशी केली होती. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली होती. 

आमदार मौलाना मुफ्तींचा सनसनाटी आरोप 

आता मालेगाव गोळीबार प्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी विधानसभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख हे मास्टर माईंड असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पकडलेले शूटर हे हमाल असून मुख्य आरोपी नाहीत. घटनेतील मास्टर माईंडला अटक करावी, अशी मागणी त्यांनी विधानभवनात केली आहे. मुफ्ती इस्माईल यांच्या आरोपामुळे मालेगाव शहरातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पूर्व वैमस्यातून झाला होता गोळीबार

दरम्यान, या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले. जमिनीचे खरेदी-विक्री प्रकरण व पूर्व वैमस्यातून हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Hit & Run : नाशिक हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य संशयित स्वतःच न्यायालयात हजर

Nashik Crime : येवल्यातील 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण, मारहाण झालेल्या तरुणावरच पोक्सो गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special ReportUddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special ReportMumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्तDevendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget