एक्स्प्लोर

Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल

Indigo Crisis: गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी प्रवाशांना हाल सहन करावे लागते आहे.

Indigo Crisis: इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.

Indigo Crisis: तिकीट दरात मोठी उसळी; अनेक मार्गांवर 30 हजारांपेक्षा जास्त भाडे

विविध प्रवास संकेतस्थळांचा आढावा घेतला असता, इंडिगोव्यतिरिक्त इतर विमान कंपन्यांनी पुणे–मुंबई, मुंबई–नागपूर आणि नागपूर–पुणे मार्गावरील तिकीट दर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त लावल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि उपलब्ध उड्डाणांची कमतरता यामुळे या कंपन्यांनी दर वाढवले आहेत.

Indigo Crisis: मुंबई–नागपूर विमानभाडे तब्बल 39 हजार रुपयांवर

नागपूर विमानतळावरही परिस्थिती गंभीर आहे. इंडिगोची सात ते आठ उड्डाणे दररोज रद्द होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. इतर एअरलाईन्सने याचा फायदा घेत भाड्यात प्रचंड वाढ केली आहे. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार मुंबई–नागपूर प्रवासासाठी 39 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. वैमानिकांची कमतरता, चेक-इन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि संचालनातील विविध त्रुटींमुळे इंडिगोची सेवा कोलमडली आहे.

Indigo Crisis: 1000 हून अधिक फ्लाईट रद्द; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 'एक्स'वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले. तर इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

Indigo Crisis: व्हीआयपी प्रवाशांनाही त्रास; मुंबई विमानतळावर रात्र काढावी लागली

गुरुवारी रात्री मुंबई–नागपूर इंडिगो उड्डाण रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांना रात्रीभर मुंबई विमानतळावर थांबावे लागले. भाड्यांच्या अचानक झालेल्या वाढीमुळे सामान्य प्रवाशांनाही आर्थिक फटका बसला आहे.

Indigo Crisis: नवविवाहित जोडप्याची रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थिती

इंडिगोच्या गोंधळाचा अनोखा फटका कर्नाटकातील हुबळीच्या नवविवाहित जोडप्याला बसला. हुबळीची मेधा क्षीरसागर आणि ओडिशाच्या भुवनेश्वरचा संगम दास दोघेही बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी झाले. वधूच्या गावी हुबळी येथे 4 डिसेंबरला रिसेप्शन आयोजित होते. त्यांनी 3 डिसेंबरची विमान तिकिटे बुक केली होती; परंतु इंडिगोची सेवा कोलमडल्याने ते दोघेही हुबळीला जाऊ शकले नाहीत. परिणामी त्यांना स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थित राहण्याची वेळ आली.

Indigo Crisis: इंडिगोच्या विमानांची आजही अनेक शहरातली उड्डाणे रद्द 

- पुण्यातील इंडिगोची आज 42 विमान रद्द. 

- श्रीनगरवरून उडणारी 18 विमाने रद्द.

- वाराणसीत इंडिगोच्या 22 विमानांचं उड्डाण रद्द. 

- चंदिगडमध्ये इंडिगोकडून दहा विमानांचं उड्डाण रद्द. 

- अहमदाबादमध्ये सकाळपासून 19 उड्डाणे रद्द.

आणखी वाचा 

Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर
Murlidhar Mohol : पुणेकरांचं पूर्ण समर्थन सोबत राहिल असा मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget