Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
गिरीश महाजन... टीम फडणवीसमधले संकटमोचक... मात्र कुंभमेळा मंत्रिपदाची धुरा खांद्यावर असलेल्या गिरीश महाजन यांच्यासमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय.. ते म्हणजे तपोवनातील वृक्षतोडीला होणारा विरोध.. आता साधूग्रामसाठी दुसरी जागा शोधायची की सर्वांचा... विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध झुगारून साधूग्रामसाठी तपोवनातल्या झाडांवर कुऱ्हाड चालवायची? असा यक्षप्रश्न गिरीश महाजन आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांसमोर उभा ठाकलाय.
शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून तपोवनातल्या झाडांना राखी बांधण्यात येतेय.. या रक्षाबंधनात जेवढं पर्यावरणप्रेम दडलंय तेवढं, किंबहुना त्यापेक्षा जास्त भाजपविरोधही दडलाय... अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दर्शवत वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतली आणि फडणवीस-महाजनांना धक्का दिला... शिंदेंच्या शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढे टाकतं, थेट मैदानात उतरून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केलाय
शिंदेंच्या शिवेसनेचे खासदार राजाभाऊ वाझे यांनी लोकसभेत देखील तपोवनाचा मुद्दा उपस्थित केलाय.
आधी पर्यावरणप्रेमी.. मग सामाजिक संघटना.. नंतर कलाकार मंडळी.. आणि आता महायुतीतलेच मित्रपक्ष.. तपोवनातल्या वृक्षतोडीला सर्वांनीच विरोध केल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांसमोरचं आव्हान वाढलंय
झाडं तोडून तपोवनात साधूग्रामच्या जागेवर कोणतंच एक्झिबिशन सेंटर उभारणार नसल्याचा शब्द गिरीश महाजनांनी दिलाय
सरकारनं आश्वासन देतंय... पण दिवसेंदिवस तपोवनातील वृक्षतोडीला होणारा विरोध वाढतच चाललाय शुक्रवारी दिव्यांगांनी तपोवन गाठत जोरदार घोषणाबाजी केली
वक्षतोडीला विरोध करण्यासाठी पम्या देखील तपोवनमध्ये पोहोचला होता..
खरं तर गिरीश महाजन यांना फडणवीस सरकारमधलं संकटमोचक म्हणून ओळखलं जातं... मात्र तपोवनमधील वृक्षतोडीला वाढता विरोध पाहता आता गिरीश महाजनांवरच एक मोठं संकट ओढवलंय.. या संकटावर ते काय तोडगा शोधणार? पाहुयात मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक
All Shows


































