एक्स्प्लोर

IND vs SA :दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत विजय मिळवून देखील तिसऱ्या वनडेत दोघांना बाहेर ठेवणार? कारणं समोर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघात बदल करु शकते. 

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिले दोन सामने पार पडले आहेत. भारतानं रांची येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना 17 धावांनी जिंकला होता. तर, रायपूर येथे झालेला दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेनं 4 विकेटनं जिंकला होता. यामुळं मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आता निर्णायक तिसरा सामना  विशाखापट्टणममध्ये होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 300 हून अधिक धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे कॅप्टन केएल राहुल याला दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकण्यात अपयश आलं होतं. दक्षिण आफ्रिका दुसरा सामना जिंकून देखील तिसऱ्या सामन्यात संघात दोन बदल करु शकते. 

भारतानं पहिल्या वनडेचा संघ दुसऱ्या सामन्यात देखील कायम ठेवला होता. भारताकडे गोलंदाजीमध्ये फार बदल करण्याची संधी नाही. फलंदाजी मध्ये तिलक वर्माला संधी द्यायची झाल्यास कोणाच्या जागेवर द्यायची असा प्रश्न देखील टीम मॅनेजमेंट समोर आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर दोन्ही मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिकेनं खूप धावा काढल्या होत्या. मात्र, भारतीय संघासमोर त्याला बाहेर काढण्याचा पर्याय नाही. 

दुसरीडे दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या दोन खेळांडूना मांसपेशी दुखावल्यानं संघाबाहेर ठेवू शकतो. ज्यांना दुसऱ्या वनडेत त्रास झाला होता. दक्षिण आफ्रिका नांद्रे बर्गर आणि टोनी डीजॉर्जी यांना संघाबाहेर ठेवू शकते. त्यांच्या जागी ऑटनील बार्टमेन आणि रेयान रिकल्टन यांना संधी दिली जाऊ शकते. 

विशखापट्टणममधील भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारतानं 387 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं केवळ 117 धावा केल्या होत्या.    

 भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा 

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ  : एडन मारक्रम, क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रीत्सके, रेयान रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ऑटनील बार्टमॅन

भारत मालिका जिंकणार? 

दक्षिण आफ्रिकेनं भारताला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 असं पराभूत केलं होतं. भारतीय संघ वनडे मालिकेत परतफेड करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.  भारतीय चाहत्यांचा अपेक्षा आता तिसऱ्या वनडेतील विजयानं पूर्ण होतात का ते पाहावं लागेल. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget