एक्स्प्लोर

Nashik Hit & Run : नाशिक हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य संशयित स्वतःच न्यायालयात हजर

Nashik Hit and Run : मद्यसाठा घेवून धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला होता.

नाशिक : मद्यसाठा घेवून धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला होता. या अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलीस (Police) जखमी झाले होते. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू होता. आता या प्रकरणात मुख्य संशयित व अन्य एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्व्हासा येथून नवसारी येथे अवैध दारूसाठा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकच्या पथकाने लासलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत चांदवड-मनमाड रोडवर पाठलाग सुरू केला होता. यावेळी हरनूल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला असता वाहनाने धडक दिल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन रस्त्याच्या कडेला शेतात उलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाला. तर तीन कर्मचारी जखमी झाले. 

मुख्य संशयित स्वतःहून न्यायालयात हजर

आता या प्रकरणी अपघातातील मुख्य संशयित व अन्य एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित चांदवड न्यायालयात स्वतःहून हजर झाला. देविदास कांतीलाल पटेल असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढविल्यानंतर संशयित स्वतःहून न्यायालयात हजर झाला. पोलिसांकडून संशयिताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

कठोर कारवाई केली जाणार 

दरम्यान, नाशिकमध्ये घडलेल्या हिट अँड रन (Nashik Hit And Run) प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दखल घेतली होती. शंभूराज देसाई यांनी म्हटले होते की, राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या दोन टीमला विदेशी बनावटीची दारू एका वाहनात असल्याचा माहिती मिळाली. त्यानंतर ते या वाहनाचा पाठलाग करताना टीमवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एक कर्मचारी मृत्युमुखी पडला तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ. पण आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍याचा जीव घेणं योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ती गाडी अजूनही मिळाली नाही, पोलीस गाडीचा शोध सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget