Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे होणार सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी निगडित याचिकांवरील औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला न दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करण्यात आली. 2 डिसेंबरला विविध खंडपीठात झालेल्या सुनावणीची माहिती न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त , पुढील सुनावणी 9 डिसेंबरला. 2 डिसेंबरला या खंडपीठांनी २६४ नगरपरिषदा आणि पंचायतींच्या २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकांच्या मतमोजणी आणि निकालाला अंतरिम स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात देखील मतदार यादी, आरक्षण आणि सीमांकनाशी निगडित याचिकांवर सुनावणी पार पडली होती. मात्र, यावेळी राज्य सरकार अथवा निवडणूक आयोगाच्या वकिलांनी इतर खंडपीठांसमोर झालेल्या सुनावणीची आणि त्यांनी दिलेल्या निकालाची माहिती न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त
Nagpur news: नागपूरमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा
मागच्या तीन आठवड्यापासून नागपूर मध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा सुरु आहे ... मात्र, आज सकाळ पासून नागपूर मध्ये बहुतांश सीएनजी पंप बंद असल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी चालकांना बसत आहे. सीएनजी भरण्यासाठी तासंतास टॅक्सी चालकांना रांगेत उभे राहत असून रांगेत लागल्या नंतर मध्ये सिएनजी मिळेल याची शाश्वती नसते त्यामुळे टॅक्शी चालकांचा वेळ पण वाया जात आहे व व्यवसाय बुडत आहे. नागपूरमध्ये हरियाणा गॅसला सीएनजी पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. सध्या जिल्ह्यात 30 च्या वर सीएनजी स्टेशन सुरु केले मात्र तेथे सीएनजीचा नियमित पुरवठा होत नसल्याने बहुतांश स्टेशन बंदच असतात त्यामुळे नागपूरकर चांगलेच वैतागले आहे.
Karad Nagarparishad: निकालापूर्वीच कराडच्या नगराध्यक्षपदाची नेमप्लेट तयार
राज्यातील नगरपालिका नगरपंचायतचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे... मात्र त्या अगोदरच कराड नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजेंद्रसिंह आत्माराम यादव यांच्या कार्यकर्त्यांने लोकनियुक्त नगराध्यक्ष ही नेमप्लेट तयार करून घेतल्याने चांगली चर्चा होऊ लागले आहे. या नेमप्लेटचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत असून तिरंगी लढतीत भाजप आणि काँग्रेसला बाजूला सारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पट्ट्याला आत्मविश्वास असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. मात्र 21 डिसेंबरलाच हा कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स ठरेल. परंतु या नेमप्लेटची सध्या साताऱ्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होत नसेल तर नवल.
कराडला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्रित येत लोकशाही यशवंत विकास आघाडी माध्यमातून राजेंद्रसिंह यादवांना तर काँग्रेसने झाकीर पठाण यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते यांच्यासह अन्य सहा जण असे 9 जण नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावत आहेत. अशावेळी राजेंद्रसिंह यादव यांच्या तयार करण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या नेमप्लेटमुळे निकालापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या आणि शरद पवार पक्षाच्या गोटात उत्साहाचे तर विरोधकांच्या सन्नाटा असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.























