एक्स्प्लोर
सतीश शेट्टी हत्या : आणखी एक माजी पोलीस अधिकारी अटकेत

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयनं पुण्यातून आणखी एका माजी पोलिस अधिकाऱ्याला अटक केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव कौठाळेला आज पुण्यातून अटक करण्यात आली. कौठाळेला आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 13 जानेवारी 2010 मध्ये तळेगाव इथं सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती.
स्थानिक पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला . मात्र सीबीआयनंदेखील या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर सीबीआयनं पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला. याच तपासांतर्गत 6 एप्रिल रोजी पुणे ग्रामीण पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस भाऊसाहेब आंधळकर यांनाही अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातमी
सतीश शेट्टी हत्या: माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
