एक्स्प्लोर
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ईडीच्या ताब्यात, वरळीतील निवासस्थानी कसून चौकशी
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. यानुसार आता खातेदाराला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांना आश्वासन दिलंय.
मुंबई : येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईतल्या वरळीमधल्या समुद्र महल या अलिशान इमारतीत राहणाऱ्या राणांच्या घरी ईडीनं जवळपास 12 तास चौकशी केली. यावेळी राणा यांच्या घरातून कागदपत्र आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले आहेत. तसंच ईडीनं मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत गुन्हाही दाखल केलाय. त्यानंतर राणा कपूर यांना ईडी कार्यालयात बोलवून त्यांची चौकशी सुरु आहे. DHFL, CCD आणि IL&FS या कंपन्यांना दिलेली कर्ज थकल्यानं राणा यांच्यावरचा संशय बळावला आहे. दरम्यान राणा कपूर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन
चौकशीनंतर ईडीनं राणा कपूर यांनी ताब्यात घेत चौकशीसाठी नेलं आहे. डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप राणा कपूर यांच्यावर करण्यात आला आहे. मनी लॉर्डिंगच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचनालयाकडून (ED) सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी सुरु आहे. 'ईडी'ने कपूर यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप आणि मोठ्या प्रमाणात निधी हस्तांतर केल्याचा आरोप आहे. कपूर आणि त्यांच्या पत्नीला लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
कोण आहेत राणा कपूर, त्यांच्यावर काय आहेत आरोप
एमबीए झाल्यानंतर राणा कपूर 1980 साली बँक ऑफ अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. बँक ऑफ अमेरिकेसोबत तब्बल 16 वर्ष काम केलं. 2004 साली राणा कपूर यांनी नातेवाईक अशोक कपूर यांच्या सोबत येस बँकेची स्थापना केली. 26/11 च्या हल्ल्यात बँकेचे सहसंस्थापक अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. अशोक कपूर यांच्या पत्नी आणि राणा कपूर यांच्यात भागीदारीवरुन वादाला सुरुवात झाली. राणा यांनी वैयक्तिक संबंधानुसार येस बँकेतून कर्ज देण्यास सुरुवात केली. अनिल अंबानींचा समूह, सीजी पॉवर, एस्सार पॉवरसारख्या समुहांना मोठं कर्ज दिलं. 2017 साली बँकेनं 6 हजार 355 कोटींची रक्कम बॅडलोन म्हणून घोषित केली. 2018 साली राणा कपूर यांच्यावर कर्ज आणि ताळेबंदीत गडबड केल्याचा आरबीआयनं आरोप केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली.
ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार
काय आहे प्रकरण
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार आहेत. या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. येस बँकेच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचे शेअर्स 74 टक्क्यांनी खाली आले. आर्थिक संकटाचा सामना करीत येस बँकेच्या समभागात होणारी पडझड पाहून गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement