एक्स्प्लोर
YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. यानुसार आता खातेदाराला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांना आश्वासन दिलंय.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी येस बँकेतून 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध लावले. आज देशभरातल्या येस बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांच्या रांगा लागल्यात. यानंतर आता सरकाराने पुढे येत खातेधारकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं आश्वासन दिलंय. लवकरच या प्रकरणावर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने दिलं असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघेही या प्रकरणात लक्ष घालून आहेत. मी स्वतःही या परिस्थितीचा अभ्यास करणार असून काही निर्यण नागरिकांसाठी घेणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर इडीने छापे मारल्याची माहिती मिळत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी येस बँक खातेदारांना आश्वासीत केलं. तुमचे पैसे सुरक्षित असून रिझर्व्ह बँक या संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सीतारमण यांनी दिली. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय बँक आणि अर्थव्यवस्था यांच्या हितासाठी घेतला असल्याचेही त्या म्हणाल्या. "मी रिझर्व्ह बँकेच्या सतत संपर्कात आहे, केंद्रीय बँकेचे या प्रकरणावर पूर्ण नियंत्रण असून लवकरच हा प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. येस बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असून या प्रकरणावर आमचं नियंत्रण असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी मला आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार
काय आहे प्रकरण
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार आहेत. या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. येस बँकेच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचे शेअर्स 74 टक्क्यांनी खाली आले. आर्थिक संकटाचा सामना करीत येस बँकेच्या समभागात होणारी पडझड पाहून गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
पुढील एका महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. येस बँक कोणतेही नवीन कर्ज वितरित करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास सक्षम राहणार नाही. त्याचबरोबर देशाच्या सर्वात मोठ्या बँक एसबीआयच्या संचालक मंडळाने रोकडसंगतीचा सामना करीत येस बँकेत गुंतवणूक करण्यास 'तत्वत: मान्यता' दिली आहे. दरम्यान, आयुष्यभराची जमापुंजी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात बँकेत ठेवली होती. मात्र, आता आपले पैसे परत मिळणार की नाही या चिंतेपोटी खातेदारांची झोप उडाली.
Yes Bank Crisis | रिझर्व्ह बँकेचे येस बँकेवर निर्बंध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement