एक्स्प्लोर

भाजपचे अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार

गोटे यांनी 19 नोव्हेंबरला आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबत देखील त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

धुळे:  धुळे शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. गोटे यांनी 19 नोव्हेंबरला आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबत देखील त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार अनिल गोटे धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याबाबत धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: गोटे यांनी याबाबतची घोषणा केली होती. आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनिल गोटेंनी स्वतःला धुळे महापौरपदाच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र आमदारपदाचा राजीनामा देऊन महापौरपदाची निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर आमदार गोटे यांनी बोलण्याचं टाळलं. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर सभेत धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. बॅनरवरुन शहराचे आमदार अनिल गोटेंचाच फोटो गायब होता. याचाच जाब विचारण्यासाठी आमदार गोटे समर्थकांना घेऊन सभास्थळी पोहोचले. खरंतर गोटेंना माझा फोटो का वगळला, याचा जाब भरसभेत विचारायचा होता. मात्र आधी दानवे आणि त्यानंतर गिरीश महाजनांनी त्यांना रोखलं. मात्र त्यामुळे कार्यकर्ते चवताळले आणि त्यांनी थेट खुर्च्यांचीच मोडतोड सुरु केली. यानंतर शिवतीर्थ चौकातील आमदार अनिल गोटे यांच्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तसंच रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या तिघांच्या फोटोला स्थान नव्हते. या सभेत आमदार अनिल गोटे यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाबाबत परखड मत मांडत भाजपला घरचा आहेर दिला. दरम्यान, भाषण सुरु असताना प्रकृती खालावल्याने आमदार अनिल गोटे यांची प्रकृती खालावल्याने दहा मिनिटं सभा थांबण्यात आली होती. दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढत चालली असून याआधी आशिष देशमुख यांनी देखील आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कोण आहेत अनिल गोटे  संपूर्ण नाव - अनिल उमराव गोटे ???? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक-  1965 जनसंघ (भाजप) . ????सन 1971-1999 दैनिक लोकसत्ता (पत्रकार ) ???? सन 1974 मध्ये जनसंघ संघटन मंत्री असताना 14 नगरसेवक तत्कालीन धुळे नगर पालिकेत  निवडून आणले ???? शेतकरी संघटना (1979-1988) ???? सन 1988-1993 देवीलालजी माजी उपपंतप्रधान यांच्यासोबत काम केले. ???? 1993- स्वतःचा समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र पक्ष स्थापन ???? सन 1998 - समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र या पक्षाचे नाव बदलून लोकसंग्राम केलं ???? सन 1999-  2004 स्वतः च्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले ????सन 2009 ते 2014 -  आमदार (दुसरी टर्म ) (पक्ष -लोकसंग्राम ) ????सन  2014 मध्ये भाजप पक्षात प्रवेश, 2014 ते आजपर्यंत भाजप आमदार ???? आमदार म्हणून तिसरी टर्म
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget