एक्स्प्लोर
धनंजय मुंडेंनी स्वतः उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला
वर्ध्यातल्या पवनार गावात नेत्यांसमोरच शेतकऱ्याने कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याचा प्रयत्न केला.

वर्धा : बोंडअळीने कापूस उत्पादक किती हैराण आहेत, याची प्रचिती आज राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली. वर्ध्यातल्या पवनार गावात नेत्यांसमोरच शेतकऱ्याने कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनवणी करुनही शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. उलट त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनाच ट्रॅक्टरवर बसवलं आणि त्यांनाच कापसावर ट्रॅक्टर चालवायला सांगितलं. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक हैराण झालेला असताना सरकार मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. आपणही शेतकऱ्याचाच मुलगा असून उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवणं हे वेदनादायी असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. व्हिडिओ :
आणखी वाचा























