एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 122 वर, आज मुंबईत दहा तर सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.  त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान, कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे. एकीकडं सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जात असताना नागरिक मात्र पुरेशी खबरदारी घेतांना दिसत नाहीयेत. इस्लामपूर शहरात मात्र काही भगगत पोलिसांच्या पुढाकारने लोकांना अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून नागरिक खरेदी करत आहेत. सांगली शहरात आजपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 7 ते 11 या वेळेत 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये भाजी खरेदीसाठी सांगलीकर नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले आहेत. तरीही शहरातील मंडईत नागरिकांची झुंबड उडाली आहे. प्रशासनाने कोणीही गर्दी न करता भाजीपाला न्यावा असे आवाहन केले आहे मात्र सकाळची गर्दी पाहिली तर सांगलीमध्ये कोरोनाचा संसर्ग व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई शहर आणि उपनगर - 51 पिंपरी चिंचवड मनपा - 12 पुणे मनपा - 19 नवी मुंबई - 5 कल्याण - 5 नागपूर - 4 यवतमाळ - 4 सांगली - 9 अहमदनगर - 3 ठाणे - 3 सातारा - 2 पनवेल- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी - 1 वसई-विरार - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget