एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात कोंबड्याची झुंज थांबणार
मुंबई : राज्यात आयोजित होणाऱ्या कोंबड्यांच्या झुंजी कायमच्या बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. पशुसंवर्धन कायद्यात अंतर्गत या झुंजींवर बंदी असली, तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे या झुंजी सुरू असल्याने एन. जी. जयसिंहा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
कोंबड्यांच्या झुंजीत त्यांच्या पायाला छोटा चाकू अथवा धारदार हुक बांधले जातात. ज्यामुळे हे पक्षी घायाळ होतात, किंवा त्यांना कायमचे अंपगत्व येते; बऱ्याचदा त्यांना प्राणही गमवावे लागताे. याशिवाय या झुंजीवर जुगारही लावला जात असल्यामुळे त्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी जयसिंहा यांनी याचिकेद्वारे केली होती.
न्यायमूर्ती केमकर आणि न्यायमूर्ती कर्णिक यांनी राज्य सरकारला यासंदर्भात त्वरित पावले उचलून, या झुंजींवर कायमची बंदी आणण्याचे आदेश दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement