एक्स्प्लोर
राष्ट्रवादीला बारामतीत पाणी पाजणार : मुख्यमंत्र्यांचं आव्हान
पुणे : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजणारच अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलं आहे. थेट बारामतीत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान दिलं. 14 डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भाषणादरम्यान तहान लागली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पाण्याची बाटली लावली. मात्र पाणी पिताना त्यांना राष्ट्रवादीला पाणी पाजणार हा डायलॉग सुचला आणि भाषणादरम्यान त्यांनी तो डायलॉग उपस्थितांना सुनावला. दरम्यान बारामती नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपनं बारामती विकास आघाडी रिंगणात उतरवली आहे.
मी आता बारामतीमध्ये यासाठी पाणी प्यालो कारण येत्या 15 तारखेला राष्ट्रवादीला पाणी पाजणार आहे.
14 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांचे निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत कोण कुणाला पाणी पाजणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement