एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना टळली, सर्वजण सुखरुप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगडमधील पेण येथे एका कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. ते त्यांच्या हेलिकॉप्टरने पेणमध्ये पोहोचले, परंतु लॅण्डिंग करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर डगमगले.

रायगड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगडमधील पेण येथे एका कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. ते त्यांच्या हेलिकॉप्टरने पेणमध्ये पोहोचले, परंतु लॅण्डिंग करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर डगमगले. परंतु पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झालेला नाही. तसेच हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले, परंतु प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण मिळवले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु या काही सेकंदांच्या घटनेदरम्यान हेलिपॅडजवळ उभ्या असलेल्या लोकांना समोर काय घडतंय? याबद्दल काहीच कळत नव्हते. दरम्यान पायलटने हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवत यशस्वीपणे हेलिकॉप्टर लॅण्ड केले. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचा पीए, अभियंता, पायलट आणि को-पायलट असे पाचजण होते. अहमदनगर जिल्ह्यातील प्रचारसभा संपवून मुख्यमंत्री पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पावसामुळे हेलिपॅडचा परिसरा काही प्रमाणात चिखलमय झाला असावा. दुपारी साडेचारच्या दरम्यान सुमारे सात टन इतक्या वजनाचे हेलिकाप्टर लॅण्ड झाले. लॅण्डिंगदरम्यान हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पायलटकडून हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटतंय, असे लोकांना वाटू लागले. मात्र पायलटने वेळीच प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर लॅण्ड केले. लॅण्डिंगनंतर मुख्यमंत्री सुखरुप खाली उतरले आणि पेण येथील भाजपचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. दरम्यान, या घटनेबाबत एबीपी माझाने स्थानिक पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याशी बातचित केली. यावेळी पारसकर म्हणाले की, हेलिकॉप्टरचं वजन जास्त असल्यामुळे आणि चिखलामुळे चाकं मातीत रुतली गेली. त्यामुळे हेलिकॉप्टर थोडं डगमगलं, मात्र पायलटने त्यावर नियंत्रण मिळवलं. पायलट्सना अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्याचे ट्रेनिंग असते.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget