एक्स्प्लोर

Lata Sonawane : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, जात प्रमाणपत्र अवैध

Jalgaon News Update : आमदार सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे (Lata Sonawane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  आमदार सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे सोनवणे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे. 

लता सोनवणे यांनी 2019 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे नंदुरबार जात पडताळणी समितीने लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णया विरोधात सोनवणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, तेथे देखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा खंडपीठात दाद मागितली होती. परंतु, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आज सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली. 
 
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर कामकाज होवून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. ऋषिकेश रॉय यांनी उच्च न्यायालयाचा आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निकाल कामय ठेवला आहे. त्यामुळे आमदार लता सोनवणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.  

दरम्यान, कोर्टाच्या या निकालानंतर आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, यावर आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू स्पष्ट केली आहे. आमदारकी कुठेही गेलेले नाही, आमदारकी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळून लावली आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात ती पुन्हा री ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे, असे चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.  

प्रशासकीय प्रकियेसाठी न्यायालयात याचिका दाखल करणार; माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी 

आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैधबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून पूर्वीचाच त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याबाबतचा निकाल कायम ठेवला आहे. त्यांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रक्रिया ही प्रशासनाची आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आदिवासी समाजासाठी ची ही जागा राखीव असल्याने मी त्यांच्यासाठी लढा देत होतो. त्याला न्याय मिळाला आहे. आता पुढील प्रक्रिया लवकरात लवकर करावी या संदर्भातही मी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget