एक्स्प्लोर
हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
![हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी Cabinet Approves Projects Worth Thousands Of Crores Latest Update हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/25121528/MUM-CM-BYTE-ON-TOOR-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि लगतच्या उपनगरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईला आणखी वेगवान करणाऱ्या, 7 हजार 502 कोटींच्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा समावेश आहे. याशिवाय घोडबंदर आणि शिळफाटा या प्रमुख रस्त्यांच्या 6 पदरीकरणासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बैठकीतील महत्वाचे निर्णय:
ठाण्यात नव्याने बांधावयाच्या 775 कोटींच्या क्रिक ब्रिजला मंजुरी
ठाणे-घोडबंदर रस्ता सहा पदरी करण्यासाठी 667 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता सहा पदरी करण्यासाठी 389 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एकनाश शिंदे आणि इतर कॅबिनेट मंत्री हजर होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)