Breaking News LIVE Updates : मुंबई- गोवा महामार्गावर पेणनजीक भीषण अपघात
Breaking News LIVE Updates, November 05 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE

Background
मुंबई- गोवा महामार्गावर पेणनजीक भीषण अपघात
मुंबई- गोवा महामार्गावर पेणनजीक भीषण अपघात झाला आहे. जिते गावाजवळ एसटी बस आणि कारचा अपघात झाला असून तीन प्रवासी जखमी तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
एनसीबीच्या समीर वानखेडेंकडून ड्रग्ज केस प्रकरणाचा तपास काढून घेतला, दिल्लीला बदली
एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान केस आणि इतर प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. त्यांची दिल्लीला बदली करण्यात आली असून मुंबई झोनल डायरेक्टर या पदाचा चार्ज आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे.
भाऊबीजेपूर्वी बहिण भावावर काळाचा घाला, भीषण अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू
भाऊबीजेपूर्वी सख्ख्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसमत तालुक्यात घडलीय, दिवाळीला मामाच्या गावी जात असताना बहिण भावावर काळाने घाला घातलाय. टाकळगाव रोडवर ही घटना घडलीय. यामध्ये आदर्श अरविंद सूर्य वय वर्ष 9, व कीर्ती अरविंद सूर्य वय वर्ष 8 या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले आहे. टाकळगाव येथून वसमतकडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 16 यांनी मोटर सायकल MH 26 U 2957 ला जोरदार धडक दिली.
स्मशानभूमीमध्ये प्रकाशपर्व
अंधारावर मात करणारा दीपोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला, स्मशानभूमीही त्याला अपवाद नाही, पिंपळगाव बसवंतच्या अमरधाममध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि वन्यजीव रक्षक यांच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रकाश पर्वात स्मशानभूमी उजळून निघावी, अंधकार, अंधश्रद्धा ,भीती दूर व्हावी यासाठी गेल्या दोन तीन वर्षांपासून अमरधाममध्ये दीपोत्सव साजरा केला जातो, दिव्यांचा लखलखाट, विद्युत रोषणाई , रांगोळ्या काढून परिसर सजविण्यात आला होता तर महिला लहानमुले साऱ्यांनीच फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
