Beed News Update : शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, बीडमधील परळीतील घटना
बीड जिल्ह्यातील (Beed) परळी-धर्मापुरी रोडवरील वीर ढाब्याजवळच्या ज्वारीच्या शेतात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
Beed News Update : बीड जिल्ह्यातील परळी-धर्मापुरी रोडवरील वीर ढाब्याजवळच्या ज्वारीच्या शेतात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना घडून अनेक दिवसांचा कालावधी झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पूर्ण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेहाचा एक हात आणि एक पाय ओळखू येण्याच्या अवस्थेत असल्याने उत्तरीय तपासणी देखील घटनास्थळी करावी लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परळी तालुक्यात गेल्या तीन दिवसांत तिघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यानंतर आज आणखी एक संशयास्पद मृत्यूचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात पोलिसांनी पुरावे गोळा करायचं काम सुरू केले आहे.
दोन दिवसात तिघांचे खून
मागच्या दोन दिवसांपासून परळीमध्ये दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत यामध्ये तिघांची हत्या करण्यात आली आहे. परळीत एका 50 वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. याच घटनेत मृत महिलेची 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. परळी शहराजवळ असलेल्या आयेशा नगर भागात ही घटना घडली होती. तर दोन दिवसांपूर्वीच परळी शहराजवळील एका गावात दोघांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एक खून झाला असून ही तीन दिवसांतील खूनाची दुसरी घटना घडल्याने परळीतील कायदा सुव्यथेचे धिंडवडे निघाले आहेत.
परळी शहराजवळील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे (रा.जिरवाडी, वय ६८) यांचे शेत आहे. याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) राहत असत. या दोघा बहीण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- शेतीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून, बीडमधील घटनेने खळबळ
- Beed: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल; आरोप खोटे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा
- Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
- बीड प्रशासनाचा तुघलकी कारभार! आता तर हद्दच झाली, क्रीडा संकुलातील चार झाडे पुन्हा तोडली