एक्स्प्लोर

Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Beed: बीड पोलिसांनी एकाच महिन्यात कत्तलखान्यावर चार मोठ्या कारवाया करत 32 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बीड: कत्तल करण्यास बंदी असलेल्या गोवंशीय जनावराच्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याच्या घटना बीडमध्ये वाढताना पाहायला मिळत आहेत. एका महिन्यामध्ये चार मोठ्या कारवाया बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. ज्यामध्ये 32 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरुन हस्तगत केला आहे. तर जिल्ह्यातील 118 जनावरांच्या कत्तलखान्यातून पोलिसांनी सुटका केली आहे.

मध्यरात्री आष्टीमधल्या कत्तलखान्यावर मोठी कारवाई
आष्टी तालुक्यात दौलावडगाव येथील कत्तखान्यावर छापा टाकून गोवंशीय मांस, जनावरांसह एक टेम्पो असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने  रात्री 12.30 वाजता केली.

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये खलील हारून कुरेशी, दलील हारून कुरेशी यांनी कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कुमावत यांनी केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणाहून तीन इसम पळून गेले.

शेडसहसमोर उभा असलेल्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता 40 जनावरांची कत्तल करून तयार केलेले मांस, ज्याचे वनज पाच टन व अंदाजे किंमत 6 लाख 20 हजार रुपये, टेम्पोची किंमत 4 लाख रुपये, 3 लाख रुपयांची कार असा एकूण 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला. पंचासमक्ष घटनास्थळी मिळून आलेल्या व्यक्तींनी चौकशीअंती हारून इनामदार यांचा कत्तलखाना असल्याचे सांगितले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

अंबाजोगाईत कत्तलखान्यावर छापा,118 गोवंशीय जनावरांची सुटका
मागच्या आठवड्यात अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील एका कत्तलखान्यावर छापा मारला. या कारवाईत टेम्पो, पिकअपसह 19 लाख 15 हजार मुद्देमाल जप्त केला. तब्बल 118 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने केली.

अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील एका कत्तलखान्यात पोलिसांनी छापा मारला. त्या ठिकाणाहून गाय, बैल अशा 118 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी ही जनावरे अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील स्व. गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळेत पाठवण्यात आली. 

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने स्वाराती रुग्णालयाजवळ जनावरांचा टेम्पो पकडला होता. त्यानंतर याच पथकाने  कत्तलखान्यावर कारवाई केली. बीड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी चार मोठ्या कारवाई केल्या आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाकेZero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणाZero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुराHasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
Supreme Court on Madrasas : मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
Embed widget