एक्स्प्लोर
औरंगाबादेत धनंजय मुंडे, अजित पवारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात ही घटना घडली.
भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने धनंजय मुंडेंच्या फोटोला चप्पल फेकून मारत निषेध करण्यात आला.
अजित पवार यांनी 'माझा कट्टा''वर दिवंगत नेते गोपीनाथ यांच्या जन्म तारखेच्या बाबत धनंजय मुंडे यांचा हवाला देत वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
अजित पवार यांचं वक्तव्य
गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे, मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती.
1980 च्या सुमारास पवारांभोवती वलय होतं. त्यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो, हे पाहूनच मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर जाहीर करण्यात आला, ही माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली आहे, असा दावा अजित पवारांनी केला होता.
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते : अजित पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही.
पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी झाली होती. त्यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातली आणि मुंडेंनी निर्णय बदलला, असा दावा अजित पवारांनी केला. मुंडेंसोबत इतर आमदार जाऊ नयेत, यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यासारखे भाजप नेते प्रयत्नशील होते, असंही त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या काळात भाजप आतासारखी नव्हती, असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.
पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे
जी व्यक्ती हयात नाही त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करणं हे चुकीचं आहे. अजित पवार यांचा अभ्यास कमी असल्यामुळेच ते असं बोलले, अशी टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुनच अजित पवार बोलत आहेत, असा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला.
गोपीनाथ मुंडेंना जर जन्मतारीख बदलायची असती, तर अटल बिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती. अजित पवारांचं हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंचा बोलण्यास नकार
पंकजा यांनी अजित पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला होता. मात्र धनंजय मुंडेंनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.
संबंधित बातम्या :
पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे
मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट
“गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement