एक्स्प्लोर
डीएसपीला मारहाणप्रकरणी बेळगावच्या माजी महापौरांना न्यायालयीन कोठडी
बेळगाव : बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकराना 28 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निवृत्त पोलीस उपअधीक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी शिवाजी सुंठकर यांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. सुंठकरांना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे.
रामतीर्थ नगरमधील निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद पडोलकर यांना मारहाण केल्याचा आरोप शिवाजी सुंठकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयपीसी 307, 323, 324 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पडोलकर वॉकिंगला जात असताना सुंठकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.
आज सोमवारी सकाळी सुंठकर यांना कोर्टात हजर करण्यात आले. कणबर्गी कत्तलखान्याला विरोध म्हणून राजकारण करुन लोकप्रतिनिधींकडून सुंठकर यांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement