विशाल फटेला बनायचं होतं पाब्लो एस्कोबारसारखं, कोण आहे पाब्लो एस्कोबार?
Fraude Scam : सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे.
Fraude Case : सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. त्याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे. विशाल फटे मित्रांना पाब्लो एस्कोबार सारखा श्रीमंत व्हायची स्वप्न दाखवायचा. जाणून घ्या कोण होता पाब्लो एस्कोबार.
कोण होता पाब्लो एस्कोबार?
पाब्लो एमिलियो एस्कोबार गेविरिया हा एक कुख्यात गँगस्टर होता. पाब्लो एस्कोबारचा जन्म 1949 मध्ये कोलंबियामधील राईनग्रो येथे झाला. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्याची आई शाळेत शिक्षिका होती. अंमली पदार्थांच्या व्यापारात येण्यापूर्वी एस्कोबार चोरीच्या कारच्या व्यवसायातही सामील होता. एस्कोबारने ड्रग्सच्या व्यवसायात भरपूर पैसा कमावला. केवळ कोलंबियातच नव्हे तर जगात सर्वांत भीतीदायक मानलं जाणाऱ्या मॅडलिन ड्रग्स कार्टेलचा तो मास्टरमाईंड होता. गुन्हेगारी जगतात पाब्लो हा सगळ्यांत श्रीमंत गँगस्टर मानला जातो. एवढ्या मोठ्या अवैध धंद्यामुळे एस्कोबारचे अनेक शत्रूही होते. असे म्हटले जाते की शत्रूंनी त्याला मारण्यासाठी सुमारे 16 अब्ज रुपये खर्च केले होते, परंतु त्यांना यश मिळाले नाही.
पाहा व्हिडीओ
जगातील सर्वात मोठा गुन्हेगार
पाब्लो कोलंबियाचा एक ड्रग तस्कर होता, ज्याला एके काळी 'जगातील सर्वात मोठा गुन्हेगार' समजलं जायचं. पाब्लो कोकेनचा सगळ्यांत मोठा निर्माता आणि वितरक यासाठी जगभरात ओळखला जात असे. जगभरात चालणाऱ्या कोकेनच्या एकूण व्यापारापैकी 80 टक्के हिस्सा पाब्लोच्या नावावर होता. तो जागतिक इतिहासातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात यशस्वी गुन्हेगार मानला जातो. कारण, 1989 मध्ये फोर्ब्स मासिकाने एस्कोबारला जगातील सातव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित केलं होतं, त्याची अंदाजे संपत्ती 25 अब्ज डॉलर इतकी होती.
थंडीपासून वाचवण्यासाठी जाळले 14 करोड रुपये
पाब्लो एस्कोबारच्या मुलाने एका मुलाखतीत सांगितले होते की, पाब्लोने थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी 20 लाख डॉलर (सुमारे 14 कोटी रुपये) पेटवून त्यांची शेकोटी केली होते. त्याच्याकडे अनेक आलिशान बंगले आणि वाहने होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- Barshi Scam: फटेचा 'विशाल' गेम; दिखावा करुन दिग्गजांना भुलवलं! ब्लॅक मनीवाल्यांची चुप्पी! कॅमेरासमोर न आलेल्या गोष्टी
- Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी पहिली अटक; मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात
- अभिनेता राजकुमार रावच्या नावाने बनावट मेल, 3 कोटींचा गंडा घालण्याचा कट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha