Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी पहिली अटक; मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात
Solapur Barshi Froud Case : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे. मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Solapur Barshi Froud Case : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे. मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं आहे. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस
मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला होता. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली . विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्राना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र काल एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
कोण आहे विशाल फटे?
विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याची माहिती
सध्या बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता
बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते
मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा
अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक
विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक
फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक
NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा
2019 पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यातील काही जणांना 28 टक्के परतावा दिला
मागील तीन महिन्यात अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली
काही दिवसांपूर्वी 10 लाख गुंतवल्यास वर्षाला 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले
27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली
9 जानेवारीपासून फोन बंद असून, बार्शीतून गायब झाल्याची तक्रार
इतर महत्वाच्या बातम्या
Solapur, Barshi : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोटींच्या 'स्कॅम'मुळं खळबळ , मुख्य आरोपी विशाल फटे फरार