अभिनेता राजकुमार रावच्या नावाने बनावट मेल, 3 कोटींचा गंडा घालण्याचा कट
Rajkumar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्या नावाने चोरांनी बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून तीन कोटी रुपये उकळण्याचा कट रचला.
Rajkumar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्या नावाने चोरांनी बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून तीन कोटी रुपये उकळण्याचा कट रचला. अभिनेत्याने बनावट ईमेलची एक प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपटाच्या करारासाठी तीन कोटी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जेव्हा राजकुमार रावला या फसवणुकीची वेळीच कल्पना आली तेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
सध्या सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. आपल्या सर्वांना व्हॉट्सअॅप, मोबाईल मेसेज, इमेल्सवर दररोज सर्व प्रकारच्या मोहक ऑफर्स दिल्या जातात, त्यावर कोणी क्लिक करताच त्याचे खाते हँग होते आणि त्यादरम्यान हॅकर्स आपले काम करतात. त्यामुळे यापासून सावध राहण्याचे आवाहन बँका आणि इतर संस्था वेळोवेळी करत असतात. अनेक जण सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत, अशा परिस्थितीत चोरांनी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यालाही सोडले नाही. या अभिनेता राजकुमार रावच्या नावावर करोडोंची मागणी करण्यात आली होती.
राजकुमार रावच्या नावाने गुन्हेगारांनी बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून तीन कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता. राजकुमारने बनावट ईमेलची एक प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपट करारासाठी तीन कोटी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जेव्हा राजकुमारला या फसवणुकीची कल्पना आली तेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. राजकुमार रावने लिहिले की, ''बनावट, कृपया अशा लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडी आणि व्यवस्थापक वापरून लोकांना मूर्ख बनवत आहेत.''
राजकुमारने मेलचा एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये लिहिले आहे, 'हाय अर्जुन, तुझ्या आणि माझी व्यवस्थापक सौम्या यांच्याशी झालेल्या शेवटच्या संभाषणानुसार, मी संतोष लिखित 'हनीमून पॅकेज' नावाचा चित्रपट करण्यास तयार आहे. मी सध्या मुंबईत नाही, त्यामुळे मी मेलवरच माझी संमती पाठवत आहे. स्वाक्षरी प्रक्रिया आणि स्क्रिप्ट, मेल केलेल्या कराराची हार्ड कॉपी मी मुंबईला पोहोचल्यावर उपलब्ध होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Britain Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान? बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब
- India China Trade : सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी, 2021मध्ये 125 अब्ज डॉलरचा व्यापार
- Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha