एक्स्प्लोर
सोलापुरात रिक्षावाल्याची पोलिसाला जबर मारहाण
सोलापूर : पोलिसांवरील हल्ल्याच्या इतर घटना ताज्या असताना सोलापुरात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. सोलापूर शहरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाने जबर मारहाण केली.
सोलापूर वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाने जबर मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जादा सीट वाहतुकीला विरोध केल्याने रिक्षा चालक संतापला आणि त्याने थोट पोलिसावरच हल्ला केला. सोलापूर शहरातील गांधी चौकात ही घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. मुंबईतील वांद्र्यात पोलिस विलास शिंदे यांची एका तरुणाने हत्या केली. त्यानंतर राज्य सरकारने पोलिसांच्या सुरक्षेबाबत कडक पावलं उचलण्याचं आश्वासनही दिले. मात्र, तरीही पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत, हे सोलापुरातील या घटनेवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement