एक्स्प्लोर
पोस्ट खातं हायटेक, पोस्टाचे व्यवहार आता ऑनलाईन
औरंगाबाद : ''बदललेलं पोस्ट ऑफिस माझ्या डोळ्यासमोर आलं... आणि त्यात झालेल्या बदलाचं वर्णन...पण हे पोस्ट ऑफिस असू शकत नाही... न बदलणं हा पोस्टाचा स्थायी भाव... नावासकट आहे तसं पोस्ट ऑफिस रहायला हवं...''
सुमारे 40 वर्षांपूर्वी पुलंनी पोस्ट खात्याचं वर्णन आपल्या खुमासदार शब्दात केलं होतं... पण आता हेच चित्र बदलण्यासाठी पोस्ट खात्यानं कंबर कसली आहे... आतापर्यंत आपल्या खाकी पोतडीतून सुख-दुःखाच्या वार्ता लोकांपर्यंत पोहोचवणारा पोस्टमन काका आता हायटेक होत आहे.
पोस्टमनच्या सोबतीला आलं आहे पोस्टाचं नवं अॅप... या अॅपद्वारे स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल, बल्क डिलिव्हरी आणि रजिस्टर पोस्ट तातडीने ग्राहकांच्या हाती पडणार आहे. शिवाय ज्याने ते पाठवलं आहे, त्यालाही पत्र डिलिव्हर झाल्याची माहिती तातडीने मिळणार आहे.
'मी पोस्टमनना कधी हसताना पाहिलेलं नाही... सदैव डिलिव्हरीच्या चिंतेत असलेल्याकडून हसणं वगैरे कशी अपेक्षा ठेवायची...' असंही पुलंनी म्हटलं होतं. पण या अॅपमुळे पोस्टमनच्या चेहऱ्यावर तजेला आला. कारण त्यांचं निम्मं काम कमी झालं आहे...
आधी पत्रांची यादी करा, त्याची प्रिटेड कॉपी घ्या... त्याची नोंद करा... पण हे सगळं आता बंद... शिवाय पोस्टमनच्या कामावर थेट वरिष्ठांचं लक्ष राहील. शिवाय केलेल्या कामाची कॉपी थेट कम्प्युटरवर मिळेल... पोस्टखातेही रिलॅक्स... ग्राहकही खुश.
माणसं ऑनलाईन झाली... आणि खाकी पत्रामध्ये गुरफटलेलं पोस्ट खातं माणसांपासून ऑफलाईन झालं... पण आता काळ बदलला आहे... हे पोस्ट खात्याला कळून चुकलंय... देर आये.. दुरुस्त आये...
''पोस्टाचं थोडं देवासारखं आहे... तो देईल ते घ्यायचं... चार दिवस मनी ऑर्डरींचे 4 दिव व्हीप्यांचे... शेवटी काय आपण फक्त पत्त्याचे धनी... मजकुराचा मालक निराळाच आहे...'' हे पुलंचं वाक्य मनोमन पटतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement