एक्स्प्लोर

शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचं निधन

शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी अनिल राठोड यांची ओळख होती.

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज (5 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांनी प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना आज पहाटे 5:30 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड हे 25 वर्ष अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. इतकेच नाही तर युतीच्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी अनिल राठोड यांचा सिंहाचा वाटा होता. अहमदनगरच्या राजकारणावर दबदबा असलेल्या अनिल राठोड यांची नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.

मात्र आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड सर्वत्र  'भैया' नावाने प्रसिद्ध होते.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली "अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला. हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे," अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्यJob Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Embed widget