Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Gas cylinder LPG: घरगुती सिलिंडर नोंदणीसाठी आता २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, आता महिन्यातून एकाच सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे; यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पुणे : इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने यांनी सुरू केलेल्या हल्ल्याचे पडसाद थेट भारतीयांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या (Gas cylinder LPG) दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून २५ दिवसांचा करण्यात आला आहे, तसेच केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.(Gas cylinder LPG)
नागरिकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर अर्ज घेतल्यानंतर १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक कालावधी वाढवण्यात आला आहे.आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक केंद्रांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांनी गॅस आरक्षणासाठी एकाच वेळी ऑनलाइन प्रक्रिया केल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याने समस्या निर्माण होत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर यांनी दिली.(Gas cylinder LPG)
तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या (Gas cylinder LPG) गॅसच्या प्रति सिलिंडरच्या (वजन १४.२ किलो) किंमतीत शनिवारी ६० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली. गेल्या ११ महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. लाभार्थी उज्ज्वला योजनेचे असलेल्या व २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांनादेखील ही दरवाढ सहन करावी लागेल.(Gas cylinder LPG)
Pune News: व्यावसायिक एलपीजी गॅस ११४.५ रुपयांनी महागला
हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसच्या १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ११४.५ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकारच्या सिलिंडरची किंमत १८८३ रुपये झाली आहे. १ मार्च रोजीच १९ किलो सिलिंडरच्या किमतीत २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.(Gas cylinder LPG)
Pune News: हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे.कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे आणि उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत आहे.(Gas cylinder LPG)
Pune News: पुण्यात गॅस टंचाईचा फटका, वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यात कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. येथे एकूण पाच गॅस दाहिन्या असून, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच करण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या





















