एक्स्प्लोर

Nanded Crime: 'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ

Nanded Crime News : मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे. नांदेड बस स्थानकाच्या (Nanded Bus Stand) तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे.अशी माहिती नांदेडच्या पोलीस नियत्रंण कक्षाला एकाने फोन करून दिलीय.

Nanded Crime News : मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे. नांदेड बस स्थानकाच्या (Nanded Bus Stand) तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे. त्यात बॉम्ब स्फोट (Nanded Crime News) होणार आहे, अशी माहिती नांदेडच्या पोलीस नियत्रंण कक्षाला एकाने फोन (Threatening Call) करून दिलीय. 5 मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. नांदेड शहरातील बस स्थानकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना तक्रारपेटी तपासण्यास सांगण्यात आले. त्यात बॉम्बस्फोट होणार असा मजकूर लिहिलेली चिट्टी आढळली. दरम्यान या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. अशातच फोन नेमका कोणी केला याचा पोलिसांनी तपास सुरु केला असता वजीराबाद पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अंबाजोगाई येथून फोन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Nanded Crime News :  पाणीपुरी वाल्याच्या मोबाईलवरून 'तो' फोन, आंबेजोगाई येथून आरोपीला अटक

सायबर सेलच्या मदतीने तपास करण्यात आला तेव्हा बीड जिल्हयातील आंबेजोगाई येथून फोन आल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर वजीराबाद पोलीसांनी आंबेजोगाई गाठली आणि तपासाअंती एका पाणीपुरी वाल्याच्या मोबाईलवरून तो फोन करण्यात आल्याचे उघड झाले. पोलीसांनी पाणीपुरी वाल्याची चौकशी केली. त्यात एका अज्ञाताने महत्त्वाचा फोन करायचा म्हणून मोबाईल घेतला होता, असे त्याने सांगीतले. पाणीपुरीवाल्याकडून पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन प्राप्त केले. यावेळी स्थानिक पोलीसांची मदत घेण्यात आली. त्या माहितीच्या आधारे बेजोगाई येथील मनियार गल्ली रवीवार पेठ येथून 35 वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. आपणच फोन करून बस स्थानकात चिट्टी टाकून खोटी माहिती दिली, अफवा पसरवली, अशी कबुली आरोपी शेख सलीम याने पोलीसांना दिली. सद्या शेख सलीम याला वजीराबाद पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पूने यांनी दिली आहे.

Mumbai News : मुंबईतील नायर रुग्णालयाला धमकीचा ईमेल

दुसरीकडे मुंबईतील नायर रुग्णालयाला देखील धमकीचा ईमेल आल्याची घटना घडलीय. ईमेलमध्ये रुग्णालयात LED ब्लास्ट करणार असून 4 वाजता हा ब्लास्ट होणार आहे, अशी माहिती या मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे. तरी रुग्णालयातील डाॅक्टर आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा मेसेज ईमेलमध्ये करण्यात आला होता. दुपारी 11 च्या सुमारास आलेल्या या ईमेलमुळे रुग्णालय परिसरात भितीच वातावरण होतं. मुंबई पोलिसांच्या बाॅम्बशोधक पथकाने रुग्णालयातील तपासणी केली असता, काहीही संशयास्पद आढळून आले नाही. मात्र धमकीचा ईमेल करणाऱ्या त्या व्यक्तीचा पोलिस आता शोध घेत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget