Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Girish Mahajan on Rohit Pawar: भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरु असल्याची टीका रोहित पवारांनी केली होती. आता रोहित पवारांच्या टीकेवर गिरीश महाजनांनी पलटवार केलाय.

Girish Mahajan on Rohit Pawar: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीवरून आक्रमक झालेल्या आमदार रोहित पवार यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळेच विमान अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. तर रोहित पवार यांनी भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे म्हणत हा आरोप फेटाळला. आता मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Girish Mahajan on Rohit Pawar: राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये
गिरीश महाजन म्हणाले की, गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरू आहे हे सर्वांना दिसत आहे. मी त्या बाबतीत बोलणार नाही. दादांच्या अपघाती निधनाचे कोणी राजकारण करू नये हे मी पुन्हा सांगेन. कृपा करून कोणीही राजकारण करू नये. उगाच कोणीही काहीही बोलत आहे. कोणी म्हणतो बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतात, पायलटच्या माध्यमातून सुसाईड बॉम्ब तयार झाला. आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू नये असं मला वाटतं. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी सगळ्यांची भावना आहे. यातून सत्य बाहेर आलं पाहिजे हे सर्वांना वाटत आहे. मात्र, उगाच आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही अशी वल्गर विधान करू नये, असे त्यांनी म्हटले.
Girish Mahajan on Jay Pawar: जय पवारांबाबत काय बोलले गिरीश महाजन?
अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये 100 टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा





















