कोरोनावर मात केल्यानंतर अजित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये, सुप्रिया सुळेंचं फेसबुक लाईव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2 नोव्हेंबर रोजी कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आज ते मंत्रालयात दाखल झाले असून कामकाज करताना दिसले. विषेश म्हणजे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2 नोव्हेंबर रोजी कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आज ते मंत्रालयात दाखल झाले असून कामकाज करताना दिसले. विषेश म्हणजे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरंच अंतर ठेवलं असल्याचं लाईव्हमध्ये दिसत आहे. या लाईव्हमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे गप्पा मारताना दिसत आहेत.
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना 2 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आठवडाभर घरातच विश्रांती घेतली. त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं होतं
थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले. अजितदादांनी आता आठवडाभर तरी आराम करावा अशी काळजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज ते मंत्रालयात आल्यावर त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील होत्या. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी 17 ऑक्टोबर रोजी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 26 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
संबंधित बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन
अजित पवार होम क्वॉरन्टाईन, मात्र व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार!