अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन
अजित पवारांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी होम क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसंच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं खुद्द त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांची थकवा आला आहे, थोडा ताप आहे. मात्र त्यांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.
अजित पवारांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी होम क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसेच आजच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांना थोडा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
अजित पवार होम क्वॉरन्टाईन, मात्र व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार!
संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असंही कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.
Ajit Pawar | अजित पवार यांना कोरोना झाल्याचं काही माध्यमांचं वृत्त खोटं : पार्थ पवार
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
महत्त्वाच्या बातम्या






















