एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उरणच्या खोपटा पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला बेड्या

उरणच्या खोपटा पुलावरील वादग्रस्त मजकूर प्रकरणाचा पोलिसांनी 72 तासांत छडा लावला आहे.

रायगड : उरणच्या खोपटा पुलावर लिहिलेल्या वादग्रस्त मजकूर प्रकरणाचा 72 तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. वादग्रस्त मजकूर लिहून दहशत पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमीर उल्लाहशेख या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगरचा राहणारा आहे. तो गेली 10 वर्षे खोपटा येथे भाडेतत्वावर राहतो आणि एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. दरम्यान हा आरोपी मानसिक रुग्ण असून त्याच्यावर दोन वर्षांपासून उपचार सुरु आहेत. आरोपी अमीर उल्लाह शेखने हा संदेश का आणि कशासाठी लिहिला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळतात का याबाबत तपास केला जात आहे. उरणच्या खोपटा पुलावर लिहिण्यात आलेले संदेश हे काळ्या शाईच्या मार्करने लिहिण्यात आले असून संदेशात बगदादी, हाफिस सईद, आयसीस अशी आक्षेपार्ह नावं आहेत. काय आहे प्रकरण? उरणमधील खोपटा उड्डाणपुलावर आयसीस या दहशतवादी संघटनेचा आणि त्या संघटनेचा म्होरक्या अबु अल बगदादी यांचा उल्लेख आढळल्यानं खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर अनेक चित्रांमध्ये जेएनपीटी जहाज, विमानतळ, पेट्रोलपंप दाखवण्यात आले होते. लिहिलेला संदेश हा देवनागरी आणि इंग्रजी भाषेत होता. त्यात धोनी, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सईदसोबत कुर्ला, गोऱखपूर या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने पोलिसांनी या घटनेचा गांभीर्यानं तपास करत आहेत. उरण पोलिसांनी समुद्रातील गस्त वाढवली असून सर्व सुरक्षा य़ंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget