एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 ऑगस्ट 2019 | शनिवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 ऑगस्ट 2019 | शनिवार
1. जळगाव घरकुल घोटाळ्यातील सर्व 48 आरोपी दोषी, सुरेश जैन यांना सात वर्षांचा कारावास आणि 100 कोटींचा दंड, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तत्कालीन 30 नगरसेवकांना पाच वर्षांची शिक्षा
2. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढच्या आठवड्यात भाजपप्रवेश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची 'माझा'ला माहिती
3. भविष्यात वंचित आघाडी विरोधी पक्षनेतेपदी असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला, राणेंच्या पक्षाचं विलिनीकरण शिवसेनेशी चर्चा करुनच
4. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार, आमदार अनिल परब यांची कार्यकर्त्यांमध्ये घोषणा
5. पद्मसिंह आणि राणा जगजितसिंह पाटील यांची राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा तर वडिलांपेक्षा मुलांना करिअर महत्त्वाचं, पवारांची साथ सोडणाऱ्यांवर सुप्रिया सुळेंची टीका
6. धुळ्यातील वाघाडीत केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 13 जणांचा मृत्यू, सरकारकडून मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
7. सोलापुरात महापालिकेचा विरोध झुगारुन भाजपची बॅनरबाजी, 'नो डिजिटल झोन'मध्ये गृहमंत्री अमित शाहांच्या स्वागताचे बॅनर, पालिकेची कारवाई
8. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची एसटी डेपोत गर्दी, 1080 ज्यादा बसेस, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चालकांची अल्कोहोल टेस्ट
9. नागपूर आणि गोंदियात ऐतिहासिक मारबत बडग्यांची भव्य मिरवणूक, नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
10. समीक्षकांच्या टीकेनंतरही 'साहो'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पहिल्या दिवशी 24.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला
माझा कट्टा : लेखक देवदत्त पटनायक यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement