एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 28/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 28/07/2018*
- रायगडमधील पोलादपूरमध्ये आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली, पिकनिकला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू https://goo.gl/N1KDTm
- पोलादपूर बस दुर्घटनेतून एकमेव कर्मचारी वाचला, दरीतून वर येऊन अपघाताची माहिती, बसमधून उडी मारल्याने कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंतदेसाई अपघातातून बचावले https://goo.gl/jnJNCm
- पोलादपूर बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाखांची मदत, तर मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह, राहुल गांधींकडून शोक व्यक्त https://goo.gl/AGcT7y
- मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती, गंभीर नसलेले गुन्हे मागे घेणार https://goo.gl/LgUUdd
- मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक, त्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारु, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका https://goo.gl/jjPMDa
- तासाभरासाठी पंकजाताईंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल करा, मराठा आरक्षणावरुन शिवसेनेचा ‘सामना’तून टोला https://goo.gl/b6mJU2
- सरकार खोटं बोलत नाही हे दाखवा, चंद्रकांतदादांनी साप सोडण्याच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, छत्रपती संभाजीराजेंची मागणी https://goo.gl/6nMeyf
- मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा पेटणार, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन, महामुंबई मराठा मोर्चाचा इशारा https://goo.gl/ydcJVS
- भाजपाध्यक्ष अमित शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट, सुमारे दीड तास चर्चा https://abpmajha.abplive.in/
- राज्यभरातील डॉक्टर आज संपावर, नॅशनल मेडिकल कमिशन बिलाविरोधात इंडियन मेडिकल असोशिएशनचा आक्रमक पवित्रा https://goo.gl/dUsQ7C
- पुण्यातील रांका ज्वेलर्सचे दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास, स्टेशन परिसरात कामगारावर चाकूहल्ला करत मुद्देमाल लुटला https://goo.gl/YF3fVv
- पुण्यातील कात्रजमधील मदरशात मुलांचं लैंगिक शोषण, 21 वर्षीय मौलवीला बेड्या, 36 मुलांची सुटका https://goo.gl/mTqsC7
- यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्रीयन अधिकारी सरसावले, उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी, 'पुढचे पाऊल' संस्थेचा खास कार्यक्रम https://goo.gl/J8uruZ
- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र हॉस्पिटलमध्येच राहणार, रुग्णालयात अनेक नेत्यांची हजेरी https://goo.gl/3VLrV8
- भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाचा श्रीलंकेला क्लीन स्वीप, चारदिवसीय कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली, मात्र अर्जुन तेंडुलकरकडून निराशा https://goo.gl/PkQfRw
आणखी वाचा























