
स्मार्ट बुलेटिन | 07 मार्च 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, माध्यमांसमोर भूमिका मांडणार, हिंदू महासभेचा उद्धव यांच्या अयोध्यावारीला विरोध
2. येस बँकेचे संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महलवर ईडीचा छापा, गुन्हा दाखल, सर्वसामान्यांसह नागपूर विद्यापीठ, पिंपरी पालिकेचे कोट्यवधी अडकले
3. सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक, प्रतितोळा सोन्याचा दर 45 हजारांच्या पार, कोरोना वायरस आणि लग्नसराईमुळे सोन्याचे दर वाढले
4. दिल्ली हिंसाचाराचे धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, जमावाकडून पोलिसांना सावज करण्याचा प्रयत्न, दुचाकी जाळणाऱ्यांचाही पर्दाफाश
5. राज्यसभेसाठी भाजप कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंच्या नावाचा आग्रह, उदयनराजे, आठवलेंसह खडसेंची राज्यसभेवर रवानगीची शक्यता
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 मार्च 2020 | शनिवार | ABP Majha
6. देवेंद्र फडणवीसांनी माफी मागण्यासंदर्भात आदित्यना बोलण्याचा अधिकार नाही, बांगड्या भरा वादावर केलेल्या ट्विटवर अमृता ठाम, माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
7. एनपीआरविरोधात 1 एप्रिलपासून देशव्यापी आंदोलन करण्याचं मशिदीतून आवाहन, लातूर आणि सोलापुरात जमाते उलेमा हिंदची भूमिका
8. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा निर्णय, शिक्षकांना दिलासा
9. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एन-95 मास्क मिळणार नाहीत, अन्न व औषध प्रशासनाचे औषध दुकानांना निर्देश, साठेबाजांना दणका
10. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांची सवलत, अर्थसंकल्पात घोषणा, मुद्रांक शुल्क घटल्यानं घर स्वस्त होणार, तर अधिभारामुळं पेट्रोल-डिझेल रुपयानं महागणार
एबीपी माझा वेब टीम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
