स्मार्ट बुलेटिन | 02 डिसेंबर 2020 | बुधवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ, आंदोलन सुरुच राहणार, उद्या पुन्हा चर्चा; शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा पुरस्कार परत करू पंजाबच्या खेळाडूंचा इशारा
2. साखळी तुटल्यास प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याची गरज नाही, आयसीएमआरची माहिती; संपूर्ण देशभरात लसीकरण करण्यात येईल असं म्हटलं नसल्याचं स्पष्टीकरण
3. महाराष्ट्रातून कोणीही काही घेऊन जाऊ शकत नाही, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा योगींना इशारा; योगींची आज मुंबईतील उद्योजक, सिनेदिग्गजांशी चर्चा
4. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी समिती गठित, सेवानिवृत्त सचिव विजयकुमार अध्यक्ष, समितीला सहा महिन्यांचा कार्यकाळ
5. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हातावर शिवबंधन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; सेक्युलर म्हणजे, इतर धर्मांचा तिरस्कार नाही, उर्मिलाची प्रतिक्रिया
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 डिसेंबर 2020 | बुधवार | ABP Majha
6. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीचं उत्पन्न एक लाख कोटींच्या घरात, तर आठ महिन्यांनी राज्यभरात 25 हजार कोटींचा आमदार फंड
7. एसईबीसी कोट्यातील जागांव्यतिरिक्त तलाठीपदाच्या नियुक्त्या द्या, औरंगाबाद खंडपीठाचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
8. नारायण राणेंचा भूतकाळ रक्तरंजित, विनायक राऊतांकडून सूचक इशारा, राणेंच्या भावाच्या हत्याप्रकरणावर राऊतांचं बोट
9. पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रात भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामींच्या प्रवेशाला राष्ट्रवादीची हरकत, हा माझा अधिकार असल्याचा स्वामींचा दावा
10. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना, पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता, मालिका जिंकल्याने ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना विश्रांती