एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2019 | गुरुवार | एबीपी माझा
महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
- तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेच्या गळाला, सूत्रांची माहिती तर आमदार वैभव पिचडही भाजपत प्रवेश करण्याची शक्यता
- शहरी नक्षलवादाचे आरोप असणाऱ्या गौतम नवलखांचा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध, राज्य सरकारचा मुंबई हायकोर्टात दावा
- पालघर परिसर भूकंपाने हादरला, रात्री 1च्या सुमारास डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, 3.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेची माहिती
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक, 15 दिवस डेक्कन आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द, अनेक एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
- मुंबईसह उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी, तुर्तास लोकलवर परिणाम नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतर हिंगोलीतही पाऊस
- देवबंद विद्यापीठात मुस्लिम विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचं काम, माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांचा दावा
- राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, एक कोटी कामगारांना फायदा होणार
- 72 हजार जागांसाठी जाहीर केलेल्या मेगाभरतीला पुन्हा आचारसंहितेमुळं ब्रेक लागण्याची चिन्हं, राज्यभरातले लाखो तरुण हवालदिल
- मॉब लिंचिंगविरोधात बॉलिवूडमधील दिग्दर्शक, निर्माते, साहित्यिक मैदानात, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement