स्मार्ट बुलेटिन | 15 मे 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले; वीज पडून राज्यात दोघांचा मृत्यू, पिकांचंही नुकसान
2. यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, 28 मे रोजी मान्सून केरळमध्ये धडकण्याचा स्कायमेटचा अंदाज
3. राज्यात 1602 नवे कोरोनाबाधित, रुग्णांची संख्या साडे 27 हजारांवर; मृतांचा आकडा हजार पार, एकट्या मुंबईत साडे सोळा हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त
4. जगातील कोविड 19 च्या बळीचा आकडा तीन लाखांच्या पार, तर रुग्णांची संख्या 45 लाख, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत भारत बाराव्या स्थानावर
5. राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा, मोदींच्या भाषणानंतर सरकार निर्णय घेण्याची शक्यता
6. कन्टेन्मेंट झोन वगळता पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगधंदे सुरु करण्यास हिरवा कंदील, 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट बंधनकारक
7. मुंबईतील एलटीटीवरुन विशेष ट्रेन उत्तर प्रदेशला रवाना, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरी परतणाऱ्या परप्रांतिय मजुरांकडून मुंबई पोलीस झिंदाबादचे नारे
8. विशेष ट्रेनद्वारे बंगळुरु पोहोचलेल्या काही प्रवाशांकडून इन्स्टिट्यूशनल क्वॉन्टाईनला विरोध, 70 प्रवाशांना पुन्हा दिल्लीला पाठवलं
9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत कोरोना संकटावर चर्चा
10. बॉलिवूडच्या धकधक गर्लचा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचं 54 व्या वर्षात पदार्पण, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव