एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 14 जून 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मुंबई, अलिबागमधील मुसळधार पावसामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रायगड दौरा रद्द, तर वादळग्रस्तांच्या मदतीत सरकार अपयशी ठरल्याचा फडणवीसांचा आरोप
- मान्सून आज मुंबईसह महाराष्ट्राचा उर्वरित भाग व्यापणार, हिंगोलीतील नंदापूर रेल्वे पुलाखाली पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला
- राज्यात काल दिवसभरात 3 हजार 427 नव्या रुग्णांची भर, एकूण आकडा 1 लाख 4 हजार 568 वर, तर एकट्या मुंबईत 56 हजार 831 रुग्ण
- अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेला के पूर्व वॉर्ड ठरतोय मुंबईतील नवा हॉटस्पॉट, वॉर्डात कोरोनाचे एकूण 3 हजार 782 रुग्ण
- 15 जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ, शिक्षण संचालकांना मार्गदर्शन करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र
- मुंबईबाहेरून येणाऱ्या कोविड योद्धांना स्थानिकांनी वेगळ ठेवण्याची मागणी करणं चुकीचं', मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली
- गैरहजर राहिल्यामुळे सोलापुरातील 133 वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हे, 238 कर्मचाऱ्यांना आज दुपारपर्यंत कामावर हजर राहण्याची मुदत
- मुंबईत आतापर्यंत 91 कोरोना योद्ध्यांचा बळी, काल 4 पोलीस कर्मचारी दगावले, मुंबई पालिकेच्या 65 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
- खासदार संभाजीराजे छत्रपतींनी शेअर केला शेतात तिफण ओढतानाचा व्हीडिओ, करवीर तालुक्यातील केर्ले गावात शेतकऱ्यांसोबत घेतला पेरणीचा अनुभव
- कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरावरचा नेपाळचा दावा भारताकडून अमान्य, नेपाळकडे दस्तऐवज नाहीत, भारताचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement