स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. ईडीकडून आज पुन्हा रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठाणीची चौकशी, रियाचा सीए आणि वडिलांचीही चौकशी होण्याची शक्यता
2. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूजीसीनं दिलेल्या गाईडलाईन्स विरोधात युवासेनेसह विद्यार्थ्यांच्या याचिका
3. शिवप्रेमींच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर मनगुत्तीत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवणार, कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद
4. आज तिसरा श्रावणी सोमवार, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे प्रभू महादेवाला पुष्प शृंगार, देवस्थानचे अधीक्षक आणि पुजारी, पुरोहित यांच्याकडून महापूजेचे विधी संपन्न
5. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2020 | सोमवार | ABP Majha
6. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2 कोटींच्या पार, गेल्या 20 दिवसांत 50 लाखांची वाढ; अमेरिका, ब्राझील आणि भारतात जगभरातील 52 टक्के रुग्ण
7. राज्यात काल 12 हजार 248 नवे कोरोनाग्रस्त, 390 जणांचा मृत्यू, तर दिवसभरात 13 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त
8. कोरोना संकटासाठी मुंबईकरांना दिलासा, मुंबईत जवळपास 78 टक्के रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे, तर मृत्यूदर 5.5 टक्क्यांवर
9. नाशिक-पुणे दरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावणार, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, कॅबिनेटच्या मंजुरीनंतर भूसंपादनाला सुरुवात होणार
10. आता अमेरिकी राष्ट्रपतींप्रमाणेच पंतप्रधान मोदींनाही हवाई प्रवासासाठी 'एयरफोर्स वन'; सुरक्षा उपकरणांनी परिपूर्ण विमान वायूसेनेचे जवान उडवणार