Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 जून 2021 शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जून 2021 गुरुवार | ABP Majha
1. गुरुवारी राज्यात कोरोनाचे 9,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 9,844 नव्या रुग्णांचे निदान, राज्याचा मृत्यूदर दोन टक्क्यांवर
2. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळं तिसऱ्या लाटेची भीती, महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंधाची शक्यता, घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका, मुख्यमंत्र्यांची सूचना
3. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काल जम्मू काश्मीरमधल्या आठ पक्षांची बैठक संपन्न, नागरिकांच्या भल्यासाठी पाकसोबत चर्चा व्हावी, मेहबुबा मुफ्तींची प्रतिक्रिया
4. पवारांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट घातला, मराठी साहित्य महामंडळाच्या अक्षरयात्रा अंकात अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटलांचा लेख
5. पदोन्नतीतील आरक्षण देऊ शकत नसल्याचं राज्य सरकारचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा दावा
6. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात, बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप
7. अकरावी प्रवेशासाठी जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी, दहावीच्या अभ्यासक्रमावर ऐच्छिक परीक्षा
8. आठवडाभरापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत, राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट
9. पर्यटकांसाठी खुशखबर, गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला
10. भारतानं सीमेवर कुमक वाढवल्यानं तणाव वाढला, चीनच्या उलट्या बोंबा, आज पुन्हा दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक