Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 22 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. दीड वर्षांनंतर चित्रपटगृह आणि नाट्यगृहांची दारं रसिकांसाठी खुली, 50 टक्के आसनक्षमतेचे निर्बंध कायम, अॅम्युझमेंट पार्क सुरु करण्यासही परवानगी
तब्बल दीड वर्षांनतर आजपासून पुन्हा एकदा राज्यातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. त्यात ४ इंग्रजी आणि एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अभिनेता प्रतीक गांधी याचं पदार्पण असलेला ‘भवाई’ हा पहिला हिंदी चित्रपट आज प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवर पहाता येईल. यासोबत हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता जेम्स बॉण्डचा ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटासह 'वेनम लेट देअर बी कार्नेज, ‘द लास्ट ड्यूल’ आणि ‘ड्युन’ हे चार चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत.
2. अजित पवार कोणत्या साखर कारखान्यांच्या व्यवहाराची पोलखोल करणार याची उत्सुकता शिगेला, जरंडेश्वर कारखान्यावरुन आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणार
3. येत्या 6 महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती, सर्वप्रथम माझा व्हिजन कार्यक्रमात केली होती घोषणा
4. मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंमधलं युद्ध शिगेला, वानखेडेंना तुरुंगाचा रस्ता दाखवण्याची मलिकांची भाषा, तर वानखेडेंकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
5. कालच्या 4 तासांच्या चौकशीनंतर एनसीबी आज अभिनेत्री अनन्या पांडेची पुन्हा चौकशी करणार, ड्रग्ज प्रकरणात आणखी काही बॉलिवूड स्टार अडकण्याची शक्यता
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 22 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
6. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेत एमएमएस, एमसीएसह 17 अभ्यासक्रमास यूजीसीची परवानगी
7. काल (गुरुवारी) पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, दिवसभरात फक्त 79 रुग्णवाढ
8. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा 100 कोटी डोसचा पल्ला, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना संबोधित करणार
9. चीनमध्ये पुन्हा कोरोना रिटर्न्स; जगातील इतर देशांपैकी सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ
10. टी-20 वर्ल्डकपमध्ये इंझमाम उल हकचा पाकिस्तानऐवजी टीम इंडियाला कौल, बाबरपेक्षा विराटचं पारडं जड असल्याचं पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं मत